११ वर्षात एकदाही शून्यावर बाद नाही धोनी!

0

नवी दिल्ली: भारतीय संघाला नव्या उंचीवर नेणारा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ट्वेन्टी-२० करिअरमध्ये धोनीच्या नावावर तर एका अनोख्या विक्रमाची नोंद आहे. ट्वेन्टी-२० विश्वात गेल्या ११ वर्षात धोनी एकदाही शून्यावर बाद झालेला नाही. धोनी ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये याआधी २००६ साली द.आफ्रिकेविरुद्ध शून्यावर बाद झाला होता. यानंतर धोनीने एकूण ६४ ट्वेन्टी-२० सामने खेळले आणि यात धोनी एकदाही शून्यावर बाद झालेला नाही.

यष्टीरक्षण करताना सर्वाधिक विकेट्स
ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये यष्टीरक्षण करताना धोनीने सर्वाधिक विकेट्स घेतल्याचाही पराक्रम केला आहे. धोनीने आजवर ६३ वेळा स्टम्पिंग केले आहे, यात ४१ झेल आणि २२ स्टम्पिंग्सचा समावेश आहे. महेंद्रसिंग धोनीने भारताला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान गाठून दिले आहे. एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मध्ये संघ अनुक्रमे तिसऱ्या व दुसऱ्या स्थानावर आहे. धोनीच्या भरवशाच्या फलंदाजीने भारतीय संघाने अनेक सामने जिंकले आहेत. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या धोनीने क्रिकेटविश्वात एक फलंदाज म्हणून मॅच विनर अशी ओळख निर्माण केली. क्रमवारीत अनेकदा सहाव्या स्थानावर फलंदाजीला येऊनही धोनीने केव्हाच दबावाखाली फलंदाजी केली नाही.

धोनीच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा: विराट
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये निर्णय घेण्यासाठी महेंद्रसिंह धोनीच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ मिळत आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कर्णधारपदासाठी अद्याप मी नवा आहे, असेही तो म्हणाला. कोहली म्हणाला, मी कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे, पण वन-डे व टी-२० क्रिकेट वेगवान असते. त्यामुळे या प्रकारच्या क्रिकेटमध्ये मोक्याच्या क्षणी धोनीसारख्या व्यक्तीचा सल्ला घेतो. धोनीला अशा प्रकारच्या क्रिकेटमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्याला खेळाचे चांगले ज्ञान आहे.