१० डिसेंबरपासून भारत आणि चीन दरम्यान सैन्याभ्यास

0

नवी दिल्ली-भारत आणि चीन या दोन्ही देशात पुढील महिन्यात ७ वे सैन्याभ्यास होणार आहे. दक्षिण चीनस्थित चेंगदु शहरात हा सैन्याभ्यास होणार आहे. या सैन्याभ्यासाचे नाव ‘हाथ में हाथ’ असे ठेवण्यात आले आहे. १० डिसेंबरपासून १४ दिवस सैन्याभ्यास चालणार आहे. आतंकवादा विरोधात लढण्यासाठी आणि संरक्षण क्षमता वाढविण्यासाठी या सैन्याभ्यासात लक्ष दिले जाणार आहे.

दोन्ही देशातील १००-१०० सैनिक सहभागी होणार आहे.

डोकलाम वादानंतर भारत आणि चीन दरम्यान होत असलेला हा पहिला सैन्याभ्यास आहे. मागील वर्षी दोन्ही देशांनी सिक्कीम सेक्टरमध्ये डोकलाम आंतरराष्ट्रीय सीमेवर ७३ दिवस एकमेकांसमोर उभे होते. दरम्यान आता दोन्ही देशातील संबंधात सुधारणा होत आहे. एप्रिलमध्ये या सैन्याभ्यासाबद्दल अनौपचारिक चर्चा देखील झाली होती.

Copy