१०५ असुनही फडणवीसांचा पक्ष सत्तेबाहेर

राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसेंचा टोला

जळगाव – भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी संदर्भात गल्लीतील पक्ष असे वक्तव्य माध्यमांशी बोलतांना केले होते. त्यावर राष्ट्रवादीतुन तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले की, भाजपाचा आधी केवळ एक खासदार आणि महाराष्ट्रात १४ आमदार होते. नंतरच्या काळात पक्ष वाढला. राष्ट्रवादी लहान असला तरी सत्तेत आहे. मात्र १०५ असुनही फडणवीसांचा पक्ष हा सत्तेबाहेर असल्याचा टोला खडसे यांनी फडणवीसांना लगावला आहे. दरम्यान हम दो हमारे दो अशी त्यावेळी म्हण होती. दोन वरून २०० झाले. राष्ट्रवादी देखिल वाढेल. असं हिणवण्याची ही कोती वृत्ती फडणवीसांच्या वक्तव्यातून दिसुन येत असल्याची टिका एकनाथराव खडसे यांनी केली.