होय, मी शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी घेतलाय कंत्राट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Chief Minister clearly said in Muktainagar; Even if ‘one’ Nath is behind, another ‘Eknath’ is always with you ! मुक्ताईनगर : सहा टर्म आमदार असणार्‍यांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी घरी बसवले असून हा एक मोठा विक्रमच आहे. सुरूवातीच्या काळात एकनाथ आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मागे लागले असलेतरी हा एकनाथ मात्र सदैव सोबत असेल, साथ सोडणार नाही, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी मुक्ताईनगरातील मंगळवारच्या सभेत आमदार चंद्रकांत पाटलांना आश्वस्त केले. ते म्हणाले की, माझ्यावर कंत्राटी मुख्यमंत्री अशी टीका केली जाते मात्र मी शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी कंत्राट घेतला आहे शिवाय सर्वसामान्य जनता व शेतकर्‍यांसाठी मी कंट्रोल हातात घेतला असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुक्ताईनगरात एमआयडीसी निर्मितीची घोषणा
मुक्ताईनगर शहरातील व्यापारी संकुलाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल शिवाय शहरात एमआयडीसीची निर्मिती करण्यात येईल, अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी आयोजित सभेत दिली. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवारी मुक्ताईनगरातील क्रीडा संकुलाच्या मैदानावर मुख्यमंत्र्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी केळी उत्पादकांना भेडसावत असणार्‍या सीएमव्ही रोगाबाबत बुधवारी कॅबिनेट बैठकीत ठोस निर्णय घेण्याची ग्वाही देवून केळी उत्पादकांना आश्वस्त केले.

विकासकामांचे लोकार्पण
प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तालुक्यातील कर्की-पुरनाड सबस्टेशन, नाबार्ड योजनेंतर्गत सुखी नदीवरील पुर्नंबांध तसेच मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील जुन्या गावातील नाटेश्वर मंदिराजवळील सभागृह कामाचे रीमोट दाबून मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केले.