होमगार्डला वाद घालत शिवीगाळ : भुसावळातील फळ विक्रेत्याविरुद्ध गुन्हा

भुसावळ : शहरातील अप्सरा चौकात मंगळवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी, होमगार्ड हे शहरात गस्त करीत असतांना फळ विक्रेता जुबेर अहमद अ. खालीद याच्या दुकानावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने गर्दी कमी करून फिजीकल डीस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना दिल्यानंतर त्याने होमगार्ड नामदेव शिंदे यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली व सरकारी कामात अडथळा आणल्याने त्याच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. वाद सुरू असतांना मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली. रहदारीला अडथळा आणणे, शासनाने दिलेले कुठलेही नियम न पाळणे आदी कारणांवरून पालिकेचे अधिकारी संजय बाणाईते यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात फळ विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकारामुळे त्या परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.