हॉस्पिटलमध्ये मला डॉक्टरांकडून धमकी: कनिका कपूर

0

लखनऊ: बॉलिवूड गायिका कनिका कपूर जेव्हापासून कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. तेव्हापासून बॉलीवूड सह सामान्य नागरिकांच्या नजरा तिच्याकडे लागल्या आहे. सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. कनिका कपूरला इस्पितळात दाखल करण्यात आले असून, याठिकाणी मला डॉक्टरांकडून धमकी मिळत असल्याचे कनिकाने म्हटले आहे.

कनिका विमानतळावर चाचणी न करताच पळाली अशा चर्चा सध्या सर्वत्र आहेत. या सगळ्यात कनिकाने एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आणि स्वतःची बाजू मांडली. सध्या कनिकाला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. मला आता ताप असून, मी इस्पितळात आहे. एकटी आहे. इथे खायला आणि प्यायला काहीही मिळत नाहीये. मी फार तणावात आहे. मला नाही माहीत माझी कशी चाचणी होत आहे. याउलट डॉक्टर मला धमकावत असल्याचे म्हटले आहे.

विमानतळावर होणाऱ्या चाचण्यांपासून मी कशी पळू शकते. मी शिक्षित आहे. मी फार मेहनत घेते आणि मला माहीत नाही या सर्व गोष्टी कोण पसरवत आहे. माझं विमानतळावर पूर्ण स्क्रिनिंग झालं होतं. गेल्या तीन- चार दिवसांपासून माझी तब्येत खराब होऊ लागली. मी स्वतः माझी चाचणी करायला सांगितली. माझी चाचणी करायला त्यांनी दोन दिवस लावले. तीन दिवस मी कुठेही गेली नाही. काल संध्याकाळी मी दबाव टाकल्यावर माझी चाचणी करण्यात आली आणि मला करोना विषाणूची लागण झाल्याचं कळलं.

Copy