गिरडगाव पाझर तलाव कार्यक्षेत्रात अवैध वृक्षतोड : तलाठी व वनविभागाकडून पाहणी

0

यावल : तालुक्यातील गिरडगाव येथे पाझर तलाव कार्यक्षेत्रात अवैधरीत्या तोडलेल्या वृक्षांचे वनविभागाकडून मूल्यमापन करण्यात आले. वृक्षतोड झालेली जमीन लघूसिंचन धरणातील व ग्रामपंचायत अखत्यारीत असलेल्या पंचनाम्यात दिसून आले. या जमिनीवरची बहुमूल्य वृक्ष अवैधरीत्या किनगाव येथील लाकूड व्यापारी सद्दाम शहा खलील शहा यांना तोडताना गिरडगावच्या जागृत नागरीकांकडून प्रत्यक्ष रंगेहात पकडण्यात आले होते त्यानंतर कारवाई करत मंडळ अधिकारी सचिन जगताप व तलाठी व वन विभागातील कर्मचारी यांनी संयुक्तरीत्या पाहणी करून पुढील कारवाईसाठी 12 एप्रिल रोजी झाडांचे मूल्यमापन करण्यात आले व मोजणी करण्यात आली.

बेकायदेशीरीत्या 66 झाडांची कत्तल
बेकायदेशीर वृक्षतोडीत विविध जातीचे सुमारे 66 झाडं तोडलेली असल्याचे निष्पन्न झाले व सदर मूल्यांकन अहवाल काढून संबंधित विभागाच्या वरीष्ठ अधिकार्‍यांपर्यंत देण्यात येईल, असे सांगण्यात आले याकामी वनविभागाचे कर्मचारी ए.एम.खान वनपाल, वनरक्षक बी.वाय.नलवडे (यावल पश्चिम विभाग) व सरपंच पती मधुकर पाटील, उपसरपंच आनंदा पाटील व पोलिस पाटील अशोक पाटील व शिवाजी बोरसे व ग्रामपंचायत शिपाई पांडुरंग पाटील आदींकडून घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष चौकशी करण्यात आली. पोलिस पाटील, सरपंच उपसरपंच यांचे वनविभागाकडून जबाब घेण्यात आले आहे.

Copy