Private Advt

हॉकर्सला कंटाळून गाळेधारकांचे आयुक्तांना पत्र

जळगाव – जळगाव शहरातील बीजे मार्केटमधील गाळेधारकांनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांना हॉकर्स ला कंटाळून पत्र दिले आहे. पत्रात असे नोंदवण्यात आले आहे की, आम्ही गाळेधारक वर्षानुवर्षे बीजे मार्केट परिसरात आमचा व्यवसाय करतो. मात्र मागील काही वर्षांपासून बीजे मार्केट च्या मुख्य द्वारावर बेकायदेशीर रीत्या व्यवसाय करत होकर्सने उच्छाद मांडला आहे. हे हॉकर्स आम्हाला व्यवसाय करू देत नाहीत या उलट कारण नसताना गर्दी करतात व नागरिकांना त्रास देखील देतात. यामुळे अशा बेकायदेशीर हॉकर्स वर कारवाई करण्यात यावी.

 

या बेकायदेशीर हॉकर्स वर कारवाई व्हावी यासाठी कित्येकदा गाळेधारकांनी महानगरपालिकेला निवेदने दिली आहेत. तरीदेखील महानगरपालिकेच्या  कर्मचाऱ्यांनी यांवर कायमस्वरूपी कारवाई केलेली नाही. अशा वेळेस या लोकांसोबत सोबत महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची आर्थिक देवाण-घेवाण सुरू आहे की काय? असा प्रश्न आम्हाला पडतो असे देखील या निवेदनात लिहिले आहे.

 

हॉकर्स मुळे प्रचंड आर्थिक नुकसान

गाळेधारकांना कडून आयुक्तांना दिलेल्या निवेदनात लिहिले आहे की, या अनधिकृत हॉकर्समुळे आमच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची कोंडी होत असून त्यांना आमच्याकडे यायला त्रास होत आहे . याच बरोबर आमचे हक्काचे ग्राहक वस्तू विकत घेण्यासाठी किंवा सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी या हॉकर्स कडे जात आहेत त्यामुळे आमचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे