हैद्राबादमध्ये केमिकल केमिकल फॅक्टरीला भीषण आग; ८ कामगार गंभीर

0

हैद्राबाद: हैदराबाद शहराबाहेरील औद्योगिक विकास प्राधिकरणाच्या परिसरातील बोल्लम येथील एका केमिकल फॅक्टरीत आज शनिवारी भीषण स्फोट झाला. यात ८ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.

काही कर्मचारी फॅक्टरीत अडकलेले असण्याची शक्यता देखील स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. ज्या केमिकल फॅक्टरीत हा भाषण स्फोट झाला, त्याचे नाव विंध्य ऑर्गेनिक्स असल्याचे सांगितले जात आहे. स्फोटानंतर संपूर्ण फॅक्टरीतून मोठ्याप्रमाणावर धूर बाहेर पडत होता. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे तीन बंब पोहचले व आग विझवण्याचे काम सुरू झाले.

 

Copy