ह्यांना कोण समजावून सांगणार, हे लोक जळगाववर नक्की आफत आणणार

जळगाव – राज्यात कोरोनाचे निर्बंध कमी-अधिक प्रमाणात सगळीकडे शिथिल झाले असले, तरी पुढील संभाव्य धोके जाणून न घेता राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सुसाट सुटले आहेत. आज जळगाव शहरात भाजपा कार्यालयात बैठक झाली, त्यावेळी तर सोशल डिन्स्टन्सचा पार फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. आता ह्यांना कोण समजावून सांगणार ?

गेल्या महिन्यात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत गर्दी जमली म्हणून त्यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी खासदार, विद्यमान आमदार यांच्यासह 25 जणांवर प्रशासनाने गुन्हा दाखल केला होता. तोच न्याय आता भाजपाच्या आजच्या बैठकीला लागेल का ? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार सांगताहेत की, धोका टळलेला नाही.

#bjp #jalgaon #maharashtra #covid19