Private Advt

हिस्से वाटणीवरून डांभूर्णीत महिलेसह मुलास मारहाण

डांभूर्णी गावातील घटना : यावल न्यायालयाच्या आदेशानंतर चौघा संशयीतांविरोधात गुन्हा दाखल

यावल : हिस्से वाटणीच्या कारणावरून चौघांनी महिलेस मारहाण करीत विनयभंग करून अश्लील शिविगाळ केली. या प्रकरणी यावल पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना नोव्हेंबर 2021 मध्ये घडली असलीतरी तक्रारदाराने न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशान्वये यावल पोलिसात मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.

शेती वाटणीच्या कारणावरून हाणामारी
डांभूर्णी, ता.यावल येथील पीडीत 44 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार शेतीच्या वाटणीच्या कारणावरून 21 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी पावणेआठ वाजता गावात संशयीत आरोपी नारायण विठ्ठल कुंभार, विठ्ठल धुडकू कुंभार, पल्लवी नारायण कुंभार, वत्सलाबाई विठ्ठल कुंभार या चौघांनी पीडित व तिच्या मुलाला काठीने मारहाण केली. आरोपींनी अश्लील शिविगाळ करीत महिलेचा विनयभंग केला, या आशयाची तक्रार पीडीतेने न्यायालयात दिल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने यावल पोलिसात चौघांविरुद्ध विनयभंगांसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार अजीज शेख करीत आहे.