हिसाळे येथील जुगार अड्ड्यावर धाड

0

शिरपूर:तालुक्यातील हिसाळे येथील जुगार अड्ड्यावर थाळनेर पोलिसांनी अचानक धाड टाकून 8 जणांना जन्ना मन्ना जुगार खेळताना रंगेहात पकडले. यावेळी पोलिसांनी 93 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सविस्तर असे, यासंदर्भात थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना गोपनिय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रसाळ, पो.काँ. प्रकाश मालचे, सिराज खाटीक यांच्या पथकाने 26 रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास तरडीभावेर शिवारात रामलाल जैन (रा. हिसाळे) यांच्या शेताजवळ सार्वजनिक जागी निंबाच्या झाडाखाली अचानक धाड टाकली.
यावेळी आरोपी भीमराव शालीग्राम पाटील, अनिल भीमराव पाटील, विलास धर्मा पाटील, पवन गोविंद परदेशी, धनराज लुका परदेशी, जिजाबराव भीमराव पाटील, अरविंद भाईदास पाटील, कैलास लुका पाटील (सर्व रा. हिसाळे) यांना जुगार खेळतांना पकडण्यात आले. यावेळी जुगार खेळणार्‍यांची अंगझडती घेतल्यावर 17 हजार 370 रुपयाची रोख रक्कम, 76 हजार रुपये किमतीच्या 6 मोटरसायकली असा 93 हजार 370 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यासंदर्भात थाळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Copy