Private Advt

हिवरखेडा शिवारातून एकाची दुचाकी लांबविली

जामनेर : जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथील मोकळ्या जागेवर पार्किंगला लावलेली 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
भिकन काशिनाथ सूर्यवंशी (51, अष्टविनायक पार्क, जळगाव) यांचे हे कामानिमित्त त्यांच्या दुचाकीने जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथे रविवार, 20 मार्च रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास गेले होते. त्यावेळी त्यांनी हिवरखेडा रोडवर असलेल्या मोकळ्या जागेवर त्यांची दुचाकी पार्किंग करून लावली होती. काम आटोपून 8.30 वाजता परत आल्यानंतर त्यांना दुचाकी जागेवर आढळून आली नाही. जामनेर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल रीयाज गयास शेख करीत आहेत.