हिरा ॲग्रो तर्फे MIDC परिसरात फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण

0

जळगाव (प्रतिनिधी) : नुकताच जळगावात एक करोना रुग्ण सापडल्यानंतर शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनातर्फे शहरात ठिकठिकाणी फवारणी करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत हिरा ॲग्रोने आपली सामाजिक बांधिलकी ओळखत स्वखर्चाने सोडियम हायपो क्लोराईडची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यास सुरवात केली आहे.

यावेळी हिरा ॲग्रोचे युवराज पाटील, संदीप अहिरे, हेमंत पाटील, प्रवीण पाटील यांनी MIDC परिसरातील भागात सोडियम हायपो क्लोराईडची फवारणी करून परिसर निर्जंतुकीकरण केला.

करोना ही राष्ट्रीय आपत्ती असून याविरुद्ध सर्वानी एकजुटीने लढायला हवे या भावनेतून हिरा ॲग्रोने शासकीय कार्यालये, सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी फवारणी यंत्र देखील ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी 9307300136 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन हिरा ॲग्रोचे संचालक गिरीश खडके यांनी केले आहे.

Copy