हिराशिवा कॉलनीतील अल्पवयीन तरुणीचे अपहरण

जळगाव- हिराशिवा कॉलनीतील एका 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीस फूस लावून तिचे अपहरण करण्यात आले. ही घटना 26 रोजी त्या अल्पवयीन तरुणीच्या मावशीचे गाव बामणोद (ता.यावल) येथे घडली. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
हिराशिवा कॉलनीतील अल्पवयीन तरुणी तिच्या मावशीकडे बामणोद (ता.यावल) येथे राहत होती. बँकेतून पैसे काढून येते, असे मावशीला सांगून ती 26 रोजी सकाळी 11 वाजता घराबाहेर निघाली. ती सायंकाळपर्यंत घरी न परतल्यामुळे तिचा शोध घेतला. फूस लावून तिचे अपहरण केल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. याबाबत अल्पवयीन तरुणीच्या वडिलांनी तक्रार दिली. त्यावरुन तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल सतीश हारनाळे करीत आहेत.