हिज्बुलच्या ‘मोस्ट वॉण्डेट’ दहशतवाद्याचा खात्मा

0

श्रीनगर – दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतिपोरमध्ये भारतीय सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमुळे सुरु असणार्‍या चकमकीमध्ये हिज्बुल मुजाहिद्दीन या दशतवादी संघटनेचा महत्वाचा कंमांडर रियाज नायकू या चकमकीमध्ये ठार झाला आहे. भारतीय लष्कराने रियाजला पकडून देणार्‍याला १२ लाखांचे बक्षिस देण्याची घोषणा केली होती. बुरहान वानीच्या मृत्यूनंतर हिज्बुल मुजाहिद्दीनने रियाजला कमांडर म्हणून नियुक्त केले होते.

जम्मू काश्मीरमध्ये बुधवारी सकाळपासूनच सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. एका ठिकाणी भारतीय जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. तर दुसरीकडे हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज याला कंठस्थान घालण्यासाठी भारतीय सुरक्षादलांनी येथील एका परिसराला वेढा घातला होता. याचवेळी झालेल्या चकमकीमध्ये रियाज मारला गेला. रियाज हा सोशल मिडियाच्या माध्यमातून तरुणांनी माथी भडकवून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करुन घेण्याचे काम रियाज करायचा. सुरक्षा दलांनी रियाजचा समावेश ए प्लस प्लस कॅटेगरीच्या दहशतवादींच्या यादीमध्ये केला होता. म्हणजेच रियाज हा सर्वात धोकायदाक आणि सक्रीय दहशतवाद्यांपैकी एक होता.

Copy