हिंदू-मुस्लिमांनी एकत्र येवून सण साजरे करावे

0

वरणगाव : हिंदू मुस्लीम बांधवांनी एकत्र येवून सण साजरे केल्यास समाजातील मतांची देवाण घेवाण होण्यास मदत करता येते. यामुळे कायदा सुव्यवस्थेला बांधा निर्माण होणार नाही याकरीता समाजाने एका छताखाली येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन दत्तजयंती व पैगंबर जयती उत्सव निमित्त वरणगाव पोलिस स्टेशनच्या बैठकीत मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी सलीम शेख यांनी केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी वरणगाव पालिकेच्या नगराध्यक्षा अरुणा इंगळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, महसूल विभागाचे ए.बी. वाघ, पीएसआय रफीक पठाण, पीएसआय निलेश वाघ, महिला दक्षता समिती सदस्या सविता माळी व्यासपीठावर उपस्थित होते.

पोलिसांनी दिली पहिल्यांदाच परवानगी
कार्यक्रमाची प्रास्ताविका सहाय्यक पोलिस निरिक्षक दिलीप गागुंर्डे यांनी केली. यावेळी धर्मगुरू हजरत अली, जेष्ठ कार्यकर्ते अलाउद्दीन शेठ, मका शेठ, सामाजिक कार्यकर्ता मिलींद मेढे, माजी सरपंच शेख सईद, माजी उपसभापती शेख खलील, कलीमउद्दीन शेख, इफ्ते खारमिर्जा, हरवीम शेठ, इरफान पिंजारी, मोहम्मद हक्कीम, हाजीया खान आदी उपस्थित होते. शहरात चार वर्षानंतर पैगंबर जयंतीला पोलिसांनी पहिल्यांदाच परवानगी दिली आहे.