हिंदू जागा झाल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना

0

जळगाव : जर हिंदू जागा झाला, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल. सर्वांनी ‘एक हिंदू’ म्हणून कार्य केल्यास हिंदु राष्ट्र लवकरच स्थापन होईल. हिंदूंनी यासाठी आता एकत्र येणे आवश्यक आहे आणि तो एकत्र होत देखील असल्याचे प्रतिपादन भाग्यनगर येथील श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजपचे आमदार राजासिंह ठाकूर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवतीर्थ मैदानावर आयोजित केलेल्या हिंदू धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या प्रसंगी सनातन संस्थेचे पू. नंदकुमार जाधव, स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक सुनील घनवट उपस्थित होते.

ओवेसीवर साधला निशाणा
सभेच्या प्रारंभी समितीचे सागर म्हात्रे यांनी शंखनाद केला. त्यानंतर पू. नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर श्री. राजासिंह ठाकूर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राजासिंह ठाकूर यांनी ओवेसी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, औवेसी म्हणतो की, १५ मिनिटे पोलीस हटवा. आतापर्यंत अनेक वेळा पोलीस बाजूला झाले ओत; पण काय घडले ? जेव्हा जेव्हा पोलीस बाजूला झाले, त्या प्रत्येक वेळेला धर्मांधांची हत्या झाली. गुजरात आणि अयोध्या येथे पोलीस असतांनाही जे घडले ते सर्वांसमोर आहे. त्यामुळे ओवैसीने पोलिसांना हटवून हिंदूंना घाबरवण्याची भाषा करू नये, असे राजासिंह म्हणाले.