हिंदू जनजागृती समितीतर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलन

0

चोपडा । शहरातील तहसील कार्यालयात हिंदू जनजागृती समिती तर्फे आंदोलन करण्यात आले.त्या नंतर तहसीलदार दीपक गिरासे यांना निवेदन देण्यात आले. तहसिदलदार दिपक गिरासे यांना दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, मद्य-मांस सेवन करणे हे हिंदू धर्मशास्त्रानुसार तमोगुण वर्धक असल्यामुळे हिंदूधर्मात मद्यपान आणि मांसाहार निषिद्ध मानले जाते. महाराष्ट्रात अनेक मद्य आणि मांस विक्री करणार्‍या दुकानांना देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांची नावे देणे म्हणजे हिंदू धर्मियांची भावना दुखविणारे आहे. केंद्र शासनाचा व्यापार चिन्ह कायद्यानुसार व्यापारी उत्पन्नावर धार्मिक चिन्ह आणि चित्र मुद्रित करणे हा गुन्हा करणे. या विरोधात शहरातील व्यापार्‍यावर गुन्हा दाखल होऊन कारवाई करण्यात यावी.

निवेदनात या आहेत मागण्या
हज यात्रेसाठी देण्यात येणारे अनुदान रहित करण्यासाठी केंद्र शासनाने ठोस उपाय करून काल मर्यादा घालून कृती करावी, केरळमध्ये धर्माधाकडून होणार्‍या हिंदू नेत्याच्या हत्यांचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणे मार्फत करण्यात यावा. खासदार संसदेत गोंधळ घालून सभागृहाचे कामकाज बंद पाडतात. त्यामुळे संसदेची कोट्यवधी रुपयांची हानी होते. ही हानी भरून काढण्यासाठी खासदारांच्या वेतनातून वसूल करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे यशवंत चौधरी, जनार्धन शिंदे, सुधाकर राजपूत, अरविंद पाटील, कमलेश पाटील, राधेश्याम साखरे, रविंद्र वाघ, राजेंद्र बारी, नवल माळी, नितीन महाजन, जगदीश राजपूत, सनातन संस्थेचे अनिल पाटील उपस्थित होते.