हिंदू जनजागृतीतर्फे मनपासमोर आंदोलन

0

जळगाव । मद्य-मांस सेवन करणे हे हिंदु धर्मशास्त्रानुसार तमोगुण वर्धक असल्याने हिंदुधर्मात मद्यपान आणि मांसाहार निषिध्द मानले जाते. महाराष्ट्रात अनेक मद्य आणि मांस विक्री करणार्‍या दुकानांना देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांची नावे दिलेली आढळतात. हे हिंदु धर्मीयांचे भावना दुखविणारे आहे. केंद्र शासनाच्या व्यापार चिन्ह कायदा 1999 मधील कलम 9(2) बी नुसार व्यापारी उत्पादनावर धार्मिक चिन्ह आणि चित्र मुद्रित करणे हा गुन्हा आहे.

..तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणेने करावा
याविरोधात शहरातील व्यापार्‍यांवर गुन्हा दाखल होवुन कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय हिंदु आंदोलनतर्फे करण्यात आली आहे. शनिवारी 18 रोजी महानगर पालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. हज यात्रेसाठी देण्यात येणारे अनुदान रहित करण्यासाठी केंद्र शासनाने ठोस, कालमर्यादा घालुन कृती करावी, केरळमध्ये धर्माधांकडून होणार्‍या हिंदू नेत्यांच्या हात्यांचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणे मार्फत करण्यात यावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली.