हिंदु जनजागृती समितीतर्फे शिवजयंती उत्साहात

0

चोपडा । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजरा करण्यात येणार्‍या शिवजयंती निमित्ताने आज शहरातील छत्रपती शिवाजी चौकातील गोब्राह्मणपतीपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हिंदु जनजागृती समिती तथा स्वराज्य निर्माण सेनेतर्फे हिंदु जनजागृती समितीचे अनिल पाटील यांच्याहस्ते सकाळी दुग्धभिषेक करून नंतर जलाभिषेक करण्यात आला. यावेळी विवेक महाराज यांनी मंत्रोउच्चार करीत विधिवत पूजा सांगितली. त्यानंतर शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून शिवरायांची आरती गाऊन त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी हिंदु जनजागृती समितीचे अशोक पाटील, भालचंद्र राजपूत, किशोर दुसाने, डिगंबर माळी, स्वराज्य निर्माण सेनेचे सुनिल सोनगीरे यासह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.

लोकउदय फाऊंडेशन
तालुक्यातील मजरे हिंगोणा येथे गावात लोकउदय फाऊंडेशन तर्फे शिवजयंती आनंदाने व हर्षोउत्साहाने साजरी करण्यात आली. लोकउदय फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.तसेच यावेळी आहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.त्या नंतर राजेश पाटील यांनी शिवरायांच्या चरित्रविषयी व्याख्यान यावेळी दिले. यावेळी लोकउदय फाऊंडेशनचे सुधाकर पाटील, भुषण सुर्यवंशी, दिनेश सुर्यवंशी, किशोर पाटील, संदीप पाटील, खुशाल पाटील यांनी परिश्रम घेतले.