हिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश

यावल : शेतमजुरास शेतात काम करताना सर्पदंश झाल्याची घटना हिंगोणा शिवारात घडली. तरुणाला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर उपचार करण्यात आले. हिंगोणा शेत-शिवारामध्ये गुरुवारी सकाळी सोहेल लियाकत अली (18, रा.मारूळ) हा तरुण शेती काम करत असताना अचानक त्याच्या डाव्या हाताच्या बोटाला सर्पदंश झाला. त्यास तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारार्थ हलवल्यानंतर डॉ.बी.बी.बारेला, डॉ.शुभम तिडके, अधिपरीचारीका नेपाली भोळे, सुमन राऊत आदींनी प्रथमोपचार केले.

Copy