…हा तर अपयश लपवण्याचा प्रयत्न; काँग्रेसची अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवर टीका

0

मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने जनतेशी संवाद साधत आहेत. यावेळी ते वापरत असलेल्या शब्दांचा उल्लेख करुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

महाजन यांनी फेसबूकवर एक पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोना हा एक आजार आहे. तो आटोक्यात आणण्यासाठी उपयुक्त वैद्यकीय उपचार व वैज्ञानिक विचार, दृष्टीची व व्यवहार्य उपायांची गरज आहे. त्याऐवजी महाभारतकी लडाई, शिवरायांचा महाराष्ट्र, लढवय्या महाराष्ट्र, या लढाईत लढणारे शूर सैनिक…. अशी युद्धज्वर निर्माण करणारी व अस्मितेला विनाकारण फुंकर घालणारी भाषणे पुन:पुन्हा करणे म्हणजे प्रत्यक्ष उद्दिष्ट साध्य करण्यातील आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न करणे आहे, असेही रत्नाकर महाजन म्हणाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या भाषणात कायम अशा प्रकारचा उल्लेख करतात. यामुळे हा अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.