हार्दिक पांड्या बनला ‘बापमाणूस’; घरी नव्या सदस्याचे आगमन

0

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बाप झाला आहे. हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिचने मुलाला जन्म दिला आहे. स्वत: हार्दिकने ही माहिती सोशल मीडियातून दिली आहे. मुलाचा फोटो शेअर करत त्यांनी ही बातमी दिली आहे. सात महिन्यापूर्वी पांड्याने नताशा स्टँकोव्हिचसोबत साखरपुडा केला होता. मात्र ती प्रेग्ननेंट असल्याचे कळल्यानंतर त्यांनी गुपचूप लग्नही केले.

Copy