हायटेक शौचालयास प्रतिसाद

0

रावेर । नगर पालिकेचे हायटेक शौचालय सुरु होताच स्मशानभूमिचा रस्ता चकाचक झाला. मागील अनेक महिन्यांपासून पालिकेचे सीईओ राहुल पाटील शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी योजना, युक्ती, गांधीगिरी करून नागरिकांना उघड्यावर शौच करू नये म्हणून प्रयत्न करत आहेे. आज त्यांना हागणदारीमुक्त करण्यासाठी नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
शहरातील रसलपुर रोड, मंगळुर दरवाजा, आठवडे बाजार, येथील हायटेक शौचालयाचे काम पुर्णत्वास आले असून सर्वात आधी रसलपुर रोड बांधलेले शौचालय सर्वसाधारण नागरिकांसाठी खुले करण्यात आले. याला उस्फूर्त प्रतिसाद देत महिला व नागरिकांनीही वापरण्यास सुरुवात केली ज्यामुळे दररोज स्मशानभूमीकडे जाणार्‍या रस्त्यावर बसणारे नागरिक आता शौचालयाचा वापर करत आहेत.

20 सिटर व्यवस्था
पालिकेने शहरात तयार केलेले शौचालय 20 सिटर असून नागरिकांसाठी पाण्याची व्यवस्था तेथेच आहे तर प्रत्येक सीटमध्ये नळ असून नागरिकांना संगीत ऐकण्यासाठी एफ.एम. बसवण्यात आले आहे. तसेच बेसिंग तर कायमस्वरूपी स्वच्छता कर्मचार्‍यांच्या निगराहनित हे शौचालय असेल. याठिकाणी नियमित स्वच्छता असल्याने प्रतिसाद मिळत आहे.

पहाटे 4 वाजेपासून जनजागृती
हायटेक शौचालय 10 रोजी सर्वसाधारण नागरिकांसाठी खुले करण्यात आले. या 20 सीटर शौचालयामध्ये एका दिवसाला सुमारे आठशे महिला व पुरुषांनी वापर केला. ज्यामुळे उघड्यावर बसणार्‍यांमध्ये कमालीची घट झालेली दिसत होती. रावेर नगर पालिकेचे मुख्यधिकारी राहुल पाटील सकाळी 4 वाजेपासून शहराच्या विविध भागात फिरुन नागरिकांना उघड्यावर बसु नये म्हणून थंडीत आपल्या पथकासोबत फिरून जनजागृती करीत आहे. यामध्ये पालिकेचे पथक नागरिकांना स्वच्छतेविषयी महत्व पटवून देत उघड्यावर शौचास बसण्याचे तोटे सांगून नागरिकांना शौचालयाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. याआधी वैयक्तिक शौचालय, गांधीगिरी, करून हागणदारीमुक्ती प्रयत्न करत आहे. बर्‍याच महिन्यांनंतर नागरिकांनीही प्रतिसाद दिला.

शहरातील सार्वजनिक शौचालय रसलपुर रोड येथील सुरुवात केली आहे. नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. आधीसुद्धा वैयक्तिक शौचालय दिल्याने उघड्यावर शौच करण्याचे प्रमाण खुप कमी झाले होते. आता आम्ही सकाळी 4 वाजेपासून उघड्यावर बसणार्‍यांना सार्वजनिक शौचालयाचा वापर करायला नागरिकांना सांगत आहे. यापुढे जर सांगूनसुद्धा ऐकत नसलेल्यांविरूध्द आम्ही पोलिस कारवाई करणार आहे.
– राहुल पाटील, मुख्यधिकारी, नगरपालिका