Private Advt

शहादा महाविद्यालयाचा संघ महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत विजयी

शहादा। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत नंदुरबार विभागीय आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादाच्या पुरुष संघाने विजेतेपद संपादन केले.

आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा शहादा महाविद्यालय येथे ‘अ’ गट आणि जीटीपी महाविद्यालय नंदुरबार येथे ‘ब’ गट अशा दोन गटात सामने खेळविण्यात आले. उपांत्य सामने ‘अ’ गटात दादासाहेब रावल महाविद्यालय, दोंडाईचा आणि पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा यांच्यात तर ‘ब’ गटात जामिया अभियांत्रिकी महाविद्यालय, अक्कलकुवा आणि जिजामाता महाविद्यालय, नंदुरबार यांच्यात झाला या सामन्यात ‘अ’ गटातून शहादा महाविद्यालय तर ‘ब’ गटातून जिजामाता महाविद्यालय अंतिम सामन्यात पोहोचले. अंतिम सामना जीटीपी महाविद्यालय नंदुरबार येथील मैदानावर खेळविण्यात आला. शहादा महाविद्यालयाच्या संघाने नाणे फेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 25 षटकात 174 धावांचा डोंगर उभा केला तर जिजामाता महाविद्यालय चा संघ सर्वबाद 65 धावा करू शकला. या विजयात शहादा महाविद्यालयाकडून संघाचा कर्णधार अभिषेक जांगिड (32 धावा), गौरव दुरंगी (68 धावा) तसेच विशाल निकम, परेश पाटील, हर्षल पाटील, मोहित पाटील, दखलसिंग, विश्वास मराठे, जयेश न्हावी, विजय भुजबळ, गोपाल गोसावी, मयूर बच्छाव यांनी उत्कृष्ट अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत संघाला विजेतेपद संपादन करून दिले.
उत्कृष्ट खेळणार्‍या खेळाडूंची जळगाव विद्यापीठस्तरीय विभागीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे. खेळाडूंना प्रशिक्षण व मार्गदर्शन महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.अरविंद कांबळे यांनी केले. या यशाबद्दल पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव कमल पाटील, संस्थेचे समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील, डॉ.एस.पी.पवार, डॉ.पी.एल.पटेल, डॉ. एन. जे. पाटील, डॉ.डी.एम.पटेल प्रा.बी.के.सोनी, डॉ.व्ही.एस. पाटील, उपप्राचार्य डॉ.एम.के.पटेल उपप्राचार्य डॉ.एस.डी. सिंदखेडकर, क्रीडा मंडळाचे संयोजक डॉ.आय.जे.पाटील, डॉ.ए.एच.जोबनपुत्रा, डॉ.जी.एस.गवई, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.अरविंद कांबळे यांनी विजेत्या खेळाडूंचे कौतुक केले.