हाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन

0

जळगाव: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका मुलीवर चार जणांनी सामुहिक बलात्कार केला. उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणावरून संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा व्हावी अशी जनभावना आहे. जळगाव शहरात देखील आंदोलन करण्यात आले असून सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वाल्मिक मेहतर समाज बावनी पंचायतीतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतांना संघटनेचे महासचिव शिवचरण ढंढोरे,  संदीप ढंढोरे, विलास लोट, हर्शल ढंढोरे, सुभाष सपकाळे, बंटी कंडारे आदींची उपस्थिती होती.

१४ सप्टेंबरला मुलीवर सामुहिक बलात्कार झाला. उपचारादरम्यान २९ सप्टेंबरला मुलीने अखेरचा श्वास घेतला. योगी सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यी समिती स्थापन केली असून आठवड्याभारत अहवाल देण्याचे आदेश दिले आहे.

Copy