हाथरस प्रकरण: राहुल गांधींनंतर TMC खासदारालाही पोलिसांकडून धक्काबुक्की

0

हाथरस: हाथरसच्या सामुहिक बलात्कारातील पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी काल गुरुवारी १ ऑक्टोबरला कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी गेले होते. मात्र संचारबंदीचे कारण देत त्यांना रोखण्यात आले, यावेळी मोठा तणाव झाली. पोलिसांनी यावेळी राहुल गांधी यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली. या घटनेवरून संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. पोलिसांच्या दादागिरीमुळे संताप व्यक्त होत असताना आज तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांना देखील पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे.

पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी जात असलेले तृणमूल काँग्रेसच्या काही खासदारांना पोलिसांनी अडवले. मात्र, आपण पीडित कुटुंबीयांना भेटणारच अशी ठाम भूमिका डेरेक ओ ब्रायन यांनी घेतली, त्यामुळे तणाव निर्माण झाला, यात त्यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली.

पोलिसांनी हाथरसमध्ये जाण्यास मज्जाव केला आहे. राजकीय नेतेच नाही तर प्रसार माध्यमांना देखील याठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

Copy