हाथरसच्या आडून दंगली भडकविण्याचा प्रयत्न; यंत्रणांचा दावा

0

हाथरस: उत्तर प्रदेशातील हाथरसमधील एका मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेवरून संपूर्ण देशात संताप व्यक्त होतो आहे. हाथरस घटनेतील पिडीत कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी होत आहे. विरोधकांकडून या प्रकरणावरून योगी आदित्यनाथ आणि भाजप सरकारवर आरोप केले जात आहे. मात्र या घटनेचे राजकारण विरोधक करत असल्याचा प्रत्यारोप भाजपकडून करण्यात आला आहे. या घटनेवरून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम होत असल्याचे आरोप होत असतांनाच आता हाथरस प्रकरणाच्या निमित्ताने जातीय दंगली भडकवण्याचा कट रचण्यात आल्याचा दावा उत्तर प्रदेशातील सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. एका अहवालानुसार एक बनावट वेबसाइट रात्रभरात तयार करण्यात आली आणि त्याद्वारे जातीय दंगली घडवण्याचा कट रचला गेला.

justiceforhathrasvictim.cardd.co ही ती वेबसाइट आहे. या वेबसाइटवर हाथरस प्रकरणातील हिंसाचाराची आग भडकवण्यासाठी काय करावे आणि काय करु नये हे सविस्तरपणे सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मदतीची नावाखाली हिंसाचार पसरवण्यासाठी निधी उभारण्यात येत असल्याचा दावा केला जात आहे. PFI, SDPI यासारख्या संघटनांनीही उत्तर प्रदेशात हिंसाचार पसरविण्यासाठी वेबसाइट तयार करण्यात समान भूमिका बजावली आहे.