हातातील काठी हिसकावून पोलिसालाच मारहाण

0

पुणे : संचारबंदी असतानाही विनाकारण घराबाहेर फिरणार्‍या तिघांना पोलीस कर्मचार्‍याने हटकल्याने एका व्यक्तीसह त्याच्या दोन मुलांनी पोलिसाच्या हातातली काठी हिसकावून घेत पोलिसालाच मारहाण केल्याची घटना प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. युनूस गुलाब आत्तार (वय – ५०), मतीन युनूस आत्तार (वय- २८), मोईन युनूस आत्तार (वय-२४) अशी आरोपींची नावे असून यातील तिघांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेवून सरकारी कामात अडथळा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी युनूस आत्तार हा देखील विनाकारण बाहेर फिरत असताना फिर्यादी पोलीस शिपाई यांनी त्यांना हटकले. तेव्हा, यावरून त्यांच्याशी वाद घालून आरोपी आणि त्याच्या दोन मुलांनी हुज्जत घातली. त्यानंतर आरोपी मतीन याने काठी हिसकावून घेत तसेच युनूस आणि मोईन यांनी लाथा बुक्क्यांनी पोलीस शिपायास मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाला आहे. संबंधित आरोपींनी पोलीस कर्मचार्‍याला जीवे मारण्याची धमकी देखील दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Copy