हाणामारीच्या गुन्ह्यांत 7 जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

0

जळगाव । नशिराबाद येथे 17 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास निवडणुकीच्या वादातून 26 जणांनी 7 जणांना मारहाण केली होती. या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी सात संशयिताना अटक केली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. त्यांना प्रथम वर्गन्यायदंडाधिकारी बी. डी. गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली.

नशिराबाद येथे 17फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मत देण्याच्या वादातून 26 जणांनी मिळून शेख फिरोज शेख समशोद्दीन पिंजारी (वय 36), शेख हारून शेख समशोद्दीन, शेख जावेद शेख समशोद्दीन, शेख मेहमूद शेख समशोद्दीन, शेख करीम शेख मासूम, शेख शब्बीर शेख करीम, शेख रहीम शेख करीम यांना बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात पोलिसांनी खलील शहा हाफीजउल्ला शहा (वय 55), रहीम शहा खलील शहा (वय 32), साबीर शहा मुसा शहा (वय 48), मुख्तार शहा मुसा शहा (वय 38), हशीम शहा साबीर शहा (वय 23), अनिस शहा साबीर शहा (वय 20), मेहमूद शहा मुसा शहा (वय 33) यांना 18 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. त्यांना न्यायाधीश गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली.