Private Advt

हळद कार्यक्रमात नाचण्यावरून वाद विकोपाला : 16 जणांविरोधात गुन्हा

चाळीसगाव : हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर विवाहितेसह तिघांना लाकडी दांड्यासह लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जखमी करण्यात आले. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात चाळीसगाव तालुक्यातील शिवापूरच्या 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

नाचण्यावरून वादंग
चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर शिवारातील राहुल पंडित चव्हाण यांच्या शेतातील घराबाहेर राहुल चव्हाण यांच्या हळदीनिमित्त गुरूवार, 12 रोजी डीजे लावण्यात आला व त्यावर नातेवाईक नृत्य करीत असताना संशयीत आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवत फिर्यादी महिलेसह तिच्या नणंदेला शिविगाळ करीत मारहाण केली व विनयभंग करण्यात आला तसेच प्रवीण चव्हाण यांना मारहाण करण्यात आली तसेच दोन्ही विवाहितांच्या अंगावरील दोन लाख 75 हजारांचे दागिणे ओढून नेण्यात आले तसेच आरोपींनी लाकडी दांडा, लोखंडी गज व मोटारसायकच्या चैनने मारहाण केल्याचा आरोप आहे.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा दाखल
विनोद मोरसिंग पवार, मनोज मोरसिंग पवार, सुनीता मोरसिंग पवार, हासींग पंडित पवार, प्रदीप ममराज पवार, बादल पंडित पवार, रोहिदास हेमा पवार, जितेश संजय पवार, वनिता संजय पवार, प्रवीण पवार, संदीप रामसिंग राठोड, लहू रामसिंग राठोड, निलेश रोहिदास पवार, उमेश रोहिदास पवार, आकाश तुळशीराम राठोड व प्रकाश तुळशीराम राठोड (सर्व रा.शिवापूर, ता.चाळीसगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक लोकेश पवार करीत आहे.