VIDEO: हरियाणा-दिल्ली शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण

0

नवी दिल्ली: केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी विधेयकाविरोधात सातत्याने शेतकरी आंदोलने होत आहे. आजही हरियाणा, दिल्लीतील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. संतप्त शेतकरी आणि पोलिसांमध्ये चकमक उडाल्याचे चित्र काही ठिकाणी पाहायला मिळाले आहे. हरियाणा ते दिल्ली असा पायी मोर्चा शेतकऱ्यांनी काढला आहे. यावेळी शेतकऱ्यांना अडविण्यात येत आहे, मात्र शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहे. दिल्ली-हरियाणा सीमेवरील अंबालाजवळ शेतकऱ्यांची पोलिसांसोबत चकमक झाली. यावेळी पाण्याचा मारा करण्यात येऊन शेतकऱ्यांना रोखण्यात आले.

Copy