Private Advt

शहराच्या विकासासाठी सर्वांनी मतभेद विसरुन एकत्र येणे गरजेचे

शहादा ः छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याच्या आगमन सोहळ्या प्रसंगी  सर्वच राजकीय,सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती मतभेद बाजूला सावरत एकत्र आले हेच शहराच्या विकासा बाबत घडले तर शहराचा चेहरा मोहरा बदलल्या शिवाय राहणार नाही यासाठी शहराच्या विकासासाठी सर्वांनी आपले अंतर्गत  मतभेद विसरुन एकत्र येणे गरजेचे असल्याचे माजी जि.प.सभापती अभिजीत पाटील यांनी सांगितले.

   येथील महालक्ष्मी नगरात सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र मोरे व मित्र परिवारातर्फे शिव स्मारक समितीच्या पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाला शिव स्मारक समितीचे एन.डी.पाटील,ज्येष्ठ नागरिक भारत अहिरे,प्रदिप आंबेकर,पत्रकार बापू घोडराज,सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र मोरे आदी उपस्थित होते.पुढे बोलतांना पाटील म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शहरात व्हावा अशी इच्छा शहरवासीयांची होती.सर्व शहरवासीयांच्या सहकार्याने शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे स्वप्न पूर्णत्वास आले असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा आकर्षक अश्वरुढ पुतळ्याचे आगमन झाले आहे.या आगमन सोहळ्यात सर्वच शहरवासीयांनी सहभाग नोंदवून एक अभूदपूर्व सोहळा शहरात संपन्न झाला.यावेळी विष्णू जोंधळे,एन.डी.पाटील,जितेंद्र मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन निलेश मराठे यांनी केले.
         दरम्यान मिरवणूकीत अकस्मात निधन झालेल्या स्व.मनोज गुरव यास उपस्थित मान्यवर व नागरिकांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी भरत बाशिंगे,महेंद्र बडगुजर,प्रविण भावसार,विक्की अहिरे,बिरारे,मोरे आदींनी परिश्रम घेतले