हरताळा येथे हरणाचे पाडस ठार

0

मुक्ताईनगर। तालुक्यातील हरताळा फाट्याजवळ असलेल्या हॉटेल गीतांजली समोरुन रस्ता पार करीत असतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत भेडकी जातीचे हरीणाचे पाडस जागीच ठार झाल्याची घटना गुरुवार 27 रोजी पहाटेच्या सुमारास घडली. मुक्ताईनगर वनपरीक्षेत्राच्या हरताळे कंपार्टमेंट शिवारात आशिया महामार्ग क्र. 46 वर हॉटेल गीतांजली समोर गुरुवार 27 च्या पहाटेच्या वेळेत अज्ञात वाहनाच्या धडकेत 4 ते 6 महीने वयाचे भेडकी जातीचे हरणाचे पाडस ठार झाल्याची घटना घडली.

पशुवैद्यकिय अधिकार्‍यांनी केले शवविच्छेदन
दरम्यान घडलेल्या घटनेची माहीती मिळताच हरताळा कंपार्टमेंटचे वनपाल डी.एम. कोळी, वनरक्षक ठोसर यांनी घटनास्थळी धाव घेतली व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नेहते यांना बोलावून हरणाच्या पाडसाचे शवविच्छेदन केले. तसेच याप्रकरणी अज्ञात वाहनाविरुद्ध प्रथम स्वरूपाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.