हरताळा फाट्याजवळील हनुमान मंदिरासमोरून दुचाकी लांबवली

The bike was parked in front of the Hanuman temple near Hartala Phata मुक्ताईनगर : तालुक्यातील हरताळा फाट्याजवळील हनुमान मंदिराजवळून चोरट्यांनी 18 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा
तक्रारदार अनिल पूनमचंद राठोड (30, मांडवेदिगर, ता.भुसावळ) यांनी त्यांची 18 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच. 19 सी.जी.2480) 6 रोजी सकाळी 10.30 वाजता हरताळा फाट्यावरील हनुमान मंदिरासमोर लावली असता चोरट्यांनी संधी साधली. या प्रकरणी रविवारी मुक्ताईनगर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक विजय पवार करीत आहेत.