हमाली करून जयराम जट झाला बास्केटबॉल खेळाडू

0

पणजी ।लहानपणीच वडीलांचे छत्र गेल्याने काम करावे लागले.घरची परिस्थिती नसल्याने पोट भरण्यासाठी काम करणे गरजेचे होते.त्याचबरोबर शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने काम करणे अतिआवश्यक होते.पैशा मिळावा म्हणून गवंडी काम करून दिवसाल दहा रूपये मजुरी मिळत होती.दहावी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर खर्च पडणार नाही शिक्षणाचा म्हणून दिल्ली गाठली.सुक्यामेव्याच्या बाजारात हमालीचे काम सुरू केले.

शिक्षणाघेवून गुजरण होत होती.2000 या वर्षात सेनादलात काम करण्याची संधी मिळाली. तेथून बास्केटबॉल सुरवात झाली आणि आता यूबीए-प्रो बास्केट बॉलच्या लीगच्या माध्यमातून अमेरिकावारीही झाली. पाचवीत असतांना जयराम जट याच्या वडिलांचे 1992 मध्ये निधन झाले.दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती.त्यामुळे काम करून पोट भरण्याशिवाय पर्याय नव्हता. दिल्लीमध्ये सुक्यामेव्याच्या गोणी उचलून दिल्ली स्थानकात नेणे आणि तिथून बाजारात आणण्याचे काम मी करत होतो.