Private Advt

हबीबगंज ते पुण्यासाठी हफसफर एक्स्प्रेस : रेल्वे प्रवाशांची होणार सोय

0
भुसावळ- रेल्वे प्रवाशांची गैरसोय टळण्यासाठी हबीबंग ते पुणे दरम्यान साप्ताहिक हफसफर रेल्वे गाडी सुरू करण्यात आली आहे. अप 22172 हबीबगंज ते पुणे ही गाडी दर शनिवारी हबीबगंजपासून सुटणार असून दुसर्‍या दिवशी रविवारी ही गाडी पुणे येथे पोहाचेल.  डाऊन पुणे ते हबीबगंज ही गाडी दर रविवारी पुणे येथून सुटून सोमवारी हबीबगंज येथे पोहोचेल. हबीबगंज ते पुणे दरम्यान या गाडीला होशंगाबाद, ईटारसी, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर व दौंड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. रेल्वे प्रवाशांनी सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.