हनी ट्रॅप, महिलांची बदनामी यामागे विनोद देशमुखांचाच हात

0

जळगाव– विनोद देशमुखला गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असून त्याच्यावर खंडणीसह अनेक गुन्हे दाखल आहे. पक्षातील लोकांकडून महिलांचा बळी दिला जात आहे. दहा वर्षांपासून विनोद देशमुखकडून अत्यंत घाणेरडे राजकारण केले असून तो पक्षातील अजगर, राक्षस आहे. हनी ट्रॅप प्रकरणामागे विनोद देशमुखच असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या कल्पना पाटील यांनी पत्रकर परिषदेत केला.पक्षात काम करणार्या महिलांचा अपमान करायचा त्यांची दिशाभूल करण्याचे काम विनोद देशमुख यांच्याकडून केले जात होते. दहा वर्षात त्यांचा कुठलाही व्यवसाय नसतांना त्यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती कशी जमा होते. याबाबत लाचलूचपत विभागाकडे याची चौकशी करण्याची मागणी महिला आघाडीतर्फे केली जाणार आहे.

राष्ट्रवादी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील यांनी मनोज वाणी यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. त्यांनी सांगितले की, मनोज वाणी याच्यावर सुद्धा अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. वाणी हा तर मोहरा असून या मागे पक्षातीलच पदाधिकारी असून मनोज वाणीचा सीडीआर आल्यानंतर हे सर्वांचे खरे चेहरे समोर येणार आहे. तसेच हनी ट्रॅपमागे विनोद देशमुखच आहे. तसेच महिलांवर केलेल्या आरोप व त्यांच्या बद्दल अश्‍लिल लिहील्याबद्दल महिला आघाडीतर्फे मानहानी व विनयभंगाचा दावा दाखल करणार असल्याचे कल्पना पाटील यांनी सांगितले.

पुरवा द्या आम्ही राजीनामे देवू

महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांकडून खंडणी वसुल केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. परंतु ज्यांच्याकडून आरोप केला जात आहे त्यांनी एक पुरवा सादर करावा. आम्ही संपुर्ण महिला पदाधिकारी पदाचा राजीनामा देणार असेही त्या म्हणाल्या.

पक्षातून देशमुखांना बडतर्फ करण्याची मागणी

महिलांच्या मुद्द्यावरुन देशमुखला निलंबित केल आहे. प्रदेशकडे याचा पुरावा देखील आहे. आम्ही विनोद देशमुख यांना पक्षातून बडतर्फ करण्याची मागणी करणार असून त्यासाठी उपोक्षणाला देखील बसणार आहोत. दोन दिवसात संपुर्ण पुरावे सादर करुन स्फोट करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

प्रदेशाध्यक्षांनी साधला संवाद

कल्पना पाटील यांनी पत्रकारपरिषदेत पुरावे सादर केले असतील. पक्षाचे काम करतांना त्यात काम करणार्यांची बदनामी कोणी करीत असेल तर आम्ही सहन करणार नाही. सर्व सत्य चौकशीनंतर समोर येईल पक्षाकडून योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे आश्‍वासन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फोनद्वारे सांगितले.

Copy