हजूर साहिब नांदेड आणि श्री गंगानगर-हजरत निजामुद्दीन दरम्यान विशेष ट्रेन धावणार

भुसावळ : रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी हजूर साहिब नांदेड आणि श्री गंगानगर / हजरत निजामुद्दीन दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हजूर साहिब नांदेड आणि श्री गंगानगर विशेष ट्रेन
अप 07623 विशेष हजूर साहिब नांदेड-श्री गंगानगर विशेष ट्रेन 1 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत दर गुरुवारी 6.50 वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी 7.20 वाजता श्री गंगानगरला पोहोचणार आहे. डाऊन 07624 विशेष श्री गंगानगर-हजूर साहिब नांदेड विशेष गाडी 3 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत दर शनिवारी 12.30 वाजता सुटल्यानंतर तिसर्‍या दिवशी 2.30 वाजता हजूर साहिब नांदेडला पोहोचेल. या गाडीला अकोला, शेगाव, मलकापूर , भुसावळ, जळगाव, अमळनेर, नंदुरबार, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, नाडियाद, अहमदाबाद, महेसाना, पालनपूर, आबू रोड, पिंडवारा, फालना, मारवार, पालीमारवार, जोधपूर, मेरता रोड, नागौर, नोखा, बिकानेर, सुरतगढ, रायसिंग नगर, श्रीकरणपूर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, एक वातानुकूलीत तृतीय श्रेणी, नऊ शयनयान आणि दोन द्वितीय श्रेणी आसन बोगी जोडण्यात येणार आहे.

हजूर साहिब नांदेड आणि हजरत निजामुद्दीन विशेष ट्रेन
डाऊन हजूर साहिब नांदेड विशेष गाडी 6 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत दर मंगळवारी नऊ वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी 10.30 वाजता हजरत निजामुद्दीनला पोहोचेल. अप 02754 विशेष हजरत निजामुद्दीन विशेष गाडी 7 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत दर बुधवार रोजी 10.40 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी 12.35 वाजता हजूर साहिब नांदेडला पोहोचणार आहे. या गाडीला परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, जळगाव, भोपाळ, झांसी, आग्रा कान्ट स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला दोन वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, दोन वातानुकूलीत तृतीय श्रेणी, 10 शयनयान आणि दोन द्वितीय श्रेणी आसन बोगी जोडण्यात येण्यात आहे. केवळ आरक्षीत तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.