Private Advt

हंबर्डीच्या विवाहितेचा छळ : पतीसह नऊ आरोपींविरोधात गुन्हा

फैजपूर : प्लॉटींगचा व्यवसाय करण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत रुपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीसह नऊ जणांविरोधात फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नऊ जणांविरोधात गुन्हा
यावल तालुक्यातील हंबर्डी येथील माहेर असलेल्या दीपाली सिद्धार्थ ताजणे (27) यांचा विवाह औरंगाबाद येथील सिद्धार्थ वेंकटराव ताजणे यांच्याशी 2018 मध्ये रीतीरीवाजानुसार झाला. लग्नाच्या सुरुवातीचे काही दिवस चांगले केल्यानंतर पती सिद्धार्थ ताजणे याने प्लॉटिंगचा व्यवसाय करण्यासाठी माहेरहून 5 लाख रुपये आणावेत अशी मागणी केली. दरम्यान विवाहितेच्या आई-वडिलांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे विवाहितेने पैसे आणले नाही. याचा राग येऊन सिध्दार्थ योने शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सासू, ननंद आणि नंदोई यांनी सतत टोमणे मारणे सुरु केले. या त्रासाला कंटाळून विवाहिता हंबर्डी येथे माहेरी निघून आल्या.

यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
बुधवार 20 एप्रिल रोजी दुपारी चार वाजता फैजपूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने पती सिद्धार्थ वेंकटराव ताजणे, सासू निर्मलाबाई व्यंकटराव ताजणे, ननंद माधुरी गणेश देहाडे, नंदोईभाऊ गणेश विलास देहाडे, भाची ऋतुजा नंदकिशोर वानखेडे रा. औरंगाबाद, ननंद रागिनी नागसेन तारे, नागसेन पांडुरंग तारे (रा. मुकुंदवाडी जालना रोड, औरंगाबाद), नणंद वैशाली नंदकुमार वानखेडे आणि नणंद सोनाली रवीकुमार वाघमारे (दोन्ही रा. औरंगाबाद) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल देविदास सुरदास करीत आहे.