स्व.मुंडे साहेबांच्या वाटेला आलेला संघर्ष आमच्यासाठी प्रेरणा देणारा

0

वरणगाव : स्व.गोपीनाथजी मुंडे यांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी असून स्व.गोपींनाथजी मुंडे साहेब यांच्या वाटेला आलेला संघर्ष हा माझ्यासह अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्या संघर्षातून आमच्या सारख्या अनुयायींना सुद्धा संघर्षच करावा लागतो मात्र त्यातून काम करण्याची ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन नगराध्यक्ष सुनील काळे यांनी व्यक्त केले. माजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री स्व.गोपीना मुंडे साहेबांना पुण्यतिथीनिमित्त नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या कार्यालयात अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष काळे बोलत होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी वरणगाव नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, कामगार नेते मिलिंदजी मेंढे, भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे अध्यक्ष अनंतराव गढे, ईरफान भाई पिंजारी, भाजपा कार्यकर्ते संजय सोनार, किशोर सोनार, मेजर कमलाकर मराठे, छोटू सेवतकर, नरेंद्र बावणे, हितेश चौधरी, शंकर पवार, शामराव धनगर, सुनील माळी, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अजय पाटील, युवा नेते संजयकुमार जैन, प्रवीण ढवळे, कैलास मराठे, भाजपा नेते अल्लाउद्दीन सेठ, संदीप माळी, कुंदन माळी, आकाष निमकर, तेजस जैन, लखन माळी, डॉ.प्रवीण चांदणे, नटराज चौधरी, गोलू राणे, डी.के.खाटीक व इतर कार्यकर्ते सोशल डिस्टन्स पाळून उपस्थित होते.

Copy