स्व.निखिलभाऊ खडसे स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिर

कोरोना काळात रक्तदान हीच स्व.निखिलभाऊंना खरी श्रद्धांजली : अ‍ॅड.रोहिणी खडसे खेवलकर

मुक्ताईनगर : स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा हे स्व.निखिलभाऊ खडसे यांचे स्वप्न होते व सूतगिरणीच्या माध्यमातून ते पुर्ण होत आहे. निखिलभाऊ जि.प.सदस्य असताना त्यांनी उत्कृष्ठ कार्य केले त्यांच्यात असलेल्या संघटन कौशल्या द्वारे त्यांनी युवकांचे मोठे संघटन उभे केले होते. समाजातील प्रत्येक लहान थोर मंडळी सोबत त्यांचा संपर्क होता. प्रत्येक व्यक्ती सोबत ते कुठलाही अहंकार न बाळगता सदैव जिव्हाळ्याने संवाद साधत असत. प्रत्येकाच्या सुख दुःखात, गरजेच्या काळात धावून जात असत त्यांनी दाखवलेल्या समाजसेवेच्या मार्गावर आज आम्ही चालत असून कोरोना काळात रक्तदान हीच स्व.निखिलभाऊंना खरी श्रद्धांजली ठरेल, असा आशावाद जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी-खडसे खेवलकर यांनी व्यक्त केला. स्व.निखीभाऊ एकनाथराव खडसे यांच्या आठव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आदिशक्ती मुक्ताई सह सुतगिरणी येथील स्व.निखीलभाऊ खडसे स्मृतीस्थळ येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अ‍ॅड.खडसे बोलत होत्या.

135 रक्तदात्यांनी केले रक्तदान
प्रसंगी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या साहेब पाटील, अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर व गुरूनाथ खडसे यांच्याहस्ते स्व.निखिलभाऊ खडसे यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या सुचनेनुसार ब्लड फॉर महाराष्ट्र अभियान अंतर्गत स्व.निखिलभाऊ खडसे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्ताईनगरतर्फे रेड प्लस ब्लड बँक जळगाव यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी 35 दात्यांनी रक्तदान केले. यावेळी उपस्थितांनी दोन मिनिटे मौन बाळगून स्व.निखिल खडसे यांना श्रद्धांजली वाहिली.

यांची होती उपस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र भैय्यासाहेब पाटील, माजी आमदार मनीष जैन, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, नगराध्यक्ष नजमा तडवी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधर, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, युवक कार्याध्यक्ष दीपक पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, सुनील कोंडे, जिल्हा परीषद सदस्य निलेश पाटील, वैशाली तायडे, जि.प.चे माजी सदस्य सुभाष पाटील, बारसू खडसे, अशोक लाडवंजारी, अशोक पाटील, सुनील माळी, पंचायत समिती सदस्य किशोर चौधरी, माजी सभापती राजेंद्र माळी, विलास धायडे, नगरसेवक निलेश शिरसाट, बापू ससाणे, ललित महाजन, प्रवीण पाटील, माफदा तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील, महिला तालुकाध्यक्ष लता सावकारे, युवक तालुकाध्यक्ष शाहीद खान, प्रदीप साळुंखे, संदीप देशमुख, योगेश कोलते, अतुल पाटील, शिवराज पाटील, विशाल महाराज खोले, विनोद सोनवणे, डॉ.अभिषेक ठाकुर, व्हि.सी.चौधरी, संजय चौधरी, मनोज तळेले, संजय कपले, पांडुरंग नाफडे, चेतन राजपुत, सदानंद उन्हाळे, सुनील काटे, सुभाष खाटीक, सोपान कांडेलकर, पप्पू बोराखडे, दीपक साळुंखे, हर्षल झोपे, राजेंद्र कापसे, मुन्ना बोडे, राजेश ढोले, प्रवीण दामोदरे, सुशील भुते, कल्पेश शर्मा, गोपाल गंगतीरे, प्रदीप बडगुजर, किरण वंजारी, रवी खेवलकर, दिलीप पाटील, संजय माळी, अक्षय माळी, शरीफ मेकॅनिकल उपस्थित होते.

Copy