स्वामी विवेकानंद युवा फाऊंडेशनला मिळाला पुरस्कार

0

चोपडा । येथील स्वामी विवेकानंद युवा फाऊंडेशन संस्थेस बहीणाबाई युवाशक्ती 2017 पुरस्काराने गौरवण्यात आले. बहीणाबाई महोत्सव 2017 जळगाव येथील सागर पार्कवर दि. 11 ते 15 फेब्रुवारी दरम्यान साजरा होत आहे. सदर महोत्सवाचे उद्घाटन सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर ह्यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या पाच वर्षापासून चोपडा तालुक्यात बेटी-बचाओ बेटी-पढाओ, सांस्कृतीक कला, क्रीडा, युवा विकास, तळागळातील लोकांपर्यंत मदत पोहचवून फाऊंडेशने विविध समाजोपयोगी सामाजिक उपक्रमातुन स्वामी विवेकानंद युवा फाऊंडेशनच्या उल्लेखनिय कार्याला जळगाव येथील भरारी फाऊंडेशन आयोजीत बहीणाबाई युवाशक्ती 2017 ने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फाऊंडेशनच्या माध्यमातून युवकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.

पुरस्कार वितरण प्रसंगी यांची उपस्थिती

सदर पुरस्कार वितरण प्रसंगी सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर, दलुभाई जैन, निशाभाभी जैन, आ. चंदुभाई पटेल, राजुमामा भोळे (आमदार), बँक ऑफ महाराष्ट्राचे वाकचौरे व कर्णिक साहेब, अश्‍विनी शेंडगे यासह विविध मान्यवर उपस्थित होते. सामाजिक क्षेत्रात अलौकीक कार्य करणार्‍या संस्था/व्यक्तींना भरारी फाऊंडेशनतर्फे पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी कोणताही प्रस्ताव मागितला जात नाही. फाऊंडेशनच्या माध्यमातुन युवकांसाठी विविध समाजउपयोगी कार्य सुरू आहे . सदर पुरस्काराचा स्विकार फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र शिंपी यांच्यासह अब्दुल पटेल सर (सामाजीक कार्यकर्ते), आर.डी. पाटील, संजय बारी, गौरव महाले, राकेश विसपुते, दिनेश साळुंखे, गोपाल निकम, प्रसाद शुक्ल, दिपक सैंदाणे, बबलु वडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.