Private Advt

स्वामिनारायण मंदिराचा २१ वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा

चोपडा – तालुक्यातील कुसुम्बा येथील BAPS स्वामिनारायण मंदिराच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त वैश्विक महाशांतीसाठी महापूजा, आरती व अन्नकुट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून धुळे येथील स्वामिनारायण मंदिराचे कोठारी प पू आनंदजीवनदास स्वामी, पू योगीस्नेहदास स्वामी, पू अखंडमुनीदास स्वामी, पू निर्दोषवदन स्वामी यांची उपस्थिती होती, यावेळी उद्बोधन करताना पू योगीस्नेहदास स्वामी व प पू आनंदजीवनदास स्वामी यांनी प पू प्रमुख स्वामी महाराज शताब्दी महोत्सवाची माहिती दिली, याप्रसंगी गावातील तरुणांनी स्वयंसेवक काम करावे असे सांगितले, कुसुम्बा गावाला लाभलेला प्रमुख स्वामींचा सहवास लाभल्याचा उल्लेख करत BAPS संस्थेमार्फत देशात व परदेशात सुरु असलेल्या कार्याची माहिती देत शताब्दी महोत्सवात गावातून १०० स्वयंसेवकांनी सेवा द्यावी असे आवाहन केले.
 
यावेळी महाप्रसादाची सेवा व संतांचे स्वागत श्री रमेश रघुनाथ पटेल,सुनील रमेश पटेल, सतिष रमेश पटेल यांच्या परिवाराकडून करण्यात आले, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन श्रीराम पुनमचंद पटेल यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी कुसुम्बा गावातील स्वामिनारायण सत्संग मंडळाचे सहकार्य लाभले.