स्वाइन फ्लूने घेतला आणखी दोघांचा बळी

0
पिंपरी : स्वाइन फ्लूचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्लूने आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. या आजाराने शहरात जानेवारीपासून आजपर्यंत 26 जण दगावले आहेत. शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली येथील 50 वर्षीय महिलेला लक्षणे आढळल्यावरून शुक्रवारी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्रास वाढल्याने त्याच दिवशी त्यांना कृत्रिम श्‍वासोच्छवासावर ठेवण्यात आले. उपचारादरम्यान सोमवारी (दि. 24) त्यांचा मृत्यू झाला. संत तुकाराम नगर पिंपरी येथील एका 53 वर्षीय रुग्णाचा उपचार सुरु असतानाच मंगळवारी मृत्यू झाला. सध्या शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या 29 रुग्ण उपचार घेत आहेत. तर आज चार जणांना लागण झाली आहे. चार रुग्ण सध्या कृत्रिम श्‍वासोच्छ्वासावर आहेत.
Copy