स्व:राजीव गांधी जयंती:’तुमची आज आणि रोजच आठवण येते’; राहुल गांधी भावूक

0

नवी दिल्ली: दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 20 ऑगस्ट रोजी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान स्व: राहुल गांधी यांचे पुत्र कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील पिता स्व.राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. ट्वीटवर राहुल गांधींनी एक पोस्ट शेअर केली असून यात ते चांगलेच भावूक झाल्याचे दिसून आले आहे.

‘राजीव गांधी दूरदृष्टी असलेली व्यक्ती होती, प्रेमळ, दयाळू असा त्यांचा स्वभाव होता. ते माझे वडील होते याचा मला अभिमान आणि गर्व आहे. तुमची आज आणि दररोजच आठवण येते’ अशी भावूक पोस्ट राहुल गांधी यांनी शेअर केली आहे.
दरम्यान राहुल गांधी यांनी वीरभूमीला जाऊन स्व: राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.