स्वयंसेवी संघटनांच्या मदतीने स्वच्छता अभियान राबविणार

0

भुसावळ : पालिका एकट्याच्या जोरावर शहर स्वच्छ करु शकत नाही. यासाठी विद्यालये, स्वयंसेवी संस्था, मंडळे यांना स्वच्छता अभियानात सहभागी केले जात आहे. शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी मोडकळीस आलेल्या व नादुरूस्त शौचालये दुरूस्त करण्याचे काम खाजगी एजन्सीला 30 वर्षांच्या करारावर दिले जाईल. 2011 च्या जनगणनेनुसार शहरात 2 हजार 405 शौचालयाचे लक्ष पुर्ण झाल्यानंतर 5 ते 7 हजार कुटूंबांसाठी शौचालयाची गरज असणार आहे. 43 टक्के उद्दिष्ट गाठले गेले असून हागणदरीमुक्त शहरासाठी ऑक्टोबर 2017 उजाडेल, अशी माहिती मुख्याधिकारी बाविस्कर यांनी दिली.

शहर कचरामुक्त करण्याचा निश्‍चय
स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालिका सभागृहात आजी-माजी नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. यात बैठकीला मंचावर नगराध्यक्ष अख्तर पिंजारी, लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर, मुन्ना तेली उपस्थित होते. यावेळी नगरपालिका स्वयंसेवी संस्था व नागरीकांच्या सहकार्याने शहर कचरामुक्त करणार असल्याचे निश्चीत करण्यात आले.

दहा दिवसात शहरातील कचरा स्वच्छ करणार
शहरात घर तेथे शौचालय संकल्पना राबविली जाणार आहे. यात सहभागी होण्यासाठी लाभार्थ्यांकडे बँक पासबुक आवश्यक आहे. घरपट्टी बाकी असली तरी या योजनेत सहभागी होता येणार आहे. अतिक्रमण असलेल्या घरांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 19 पासून शहरात स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे. 10 दिवसात शहरातील कचरा स्वच्छ केला जाईल. दुपारी 2 ते 5 या वेळेत पालिकेचे कर्मचारी या अभियानात सहभागी होतील.

यांचे लाभणार सहकार्य
राजु सुर्यवंशी यांचे 100 कार्यकर्ते श्रमदानासाठी सहभागी होणार, नगरसेवक रवी सपकाळे एक पाण्याचे टँकर व दोन ट्रॅक्टर देणार आहे. अर्जुना संस्थेचे 22 ते 29 डिसेंबर दरम्यान शिबीर आहे. यात 150 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या विद्यार्थ्यांकडून या विषयावर निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात येवून श्रमदान केले जाईल. नगरसेवक किरण कोलते व नगरसेविका सुषमा पाटील हे प्रभाग 22 मध्ये स्वच्छता अभियान राबवतील. 1 जेसीबी व 1 ट्रॅक्टर देणार आहेत. उपनगराध्यक्ष युवराज लोणारी व नगरसेविका प्रतिभा पाटील हे प्रभाग 8 मध्ये स्वच्छता अभियान राबवतील. नगरसेवक मुकेश पाटील हे त्यांच्या खर्चाने 10 ते 12 मजुर या अभियानासाठी उपलब्ध करुन देतील.