स्वयंदीप प्रतिष्ठानतर्फे तीन दिवसीय व्याख्यानमालेस प्रारंभ

0

यावल । भविष्याचा वेध घेणे म्हणजेच इतिहास समजवून घेणे होय. यासाठी प्रत्येकाने इतिहासात डोकावून पाहावे, असे प्रतिपादन रंगकर्मी शंभू पाटील यांनी केले. जळगाव येथील स्वयंदीप प्रतिष्ठान आणि डांभूर्णीतील शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजित तीन दिवसीय व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते.

सेवानिवृत्त आयुक्त विजयकुमार पाटील यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. सरपंच पुरूजित चौधरी,स्वयंदीप प्रतिष्ठानचे सदस्य, पोलिस पाटील हेमराज सावळे, जळगाव महापालिकेचे माजी महापौर किशोर पाटील, विकास सोसायटीचे व्हाइस चेअरमन गोकुळ कोळी आदी उपस्थित होते. या वेळी बोलताना शंभू पाटील यांनी ’वेध भविष्याचा’ या विषयावर छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले.