स्वप्न साकार, मौलाना आझाद संस्थेतर्फे गरजूंना जेवण, मास्कचे वाटप

0

जळगाव। शहरातील शिरसोली रोडवरील व मोहाडी परिसरातील झोपडपट्टी भागात स्वप्न साकार फौंडेशन, मौलाना आझाद फौंडेशनच्यावतीने गरजू कुटूंबाना जेवण व मास्कचे वाटप करण्यात आहे. भारती काळे यांनी कोरोना व्हायरसबाबत महिलांना मार्गदर्शन करून अश्या परिस्थितीत सर्वांनी काळजी घ्यावी व मास्कचा वापर करावा, वारंवार हात स्वच्छ साबणाने धुवावे, घरच्या बाहेर जाऊ नये या बाबत महिलांना मार्गदर्शन केले. महिलांना जेवण सोबत १०० मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी स्वप्न साकार फाऊंडेशनचे अध्यक्षा भारती काळे, मौलाना आझाद फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख, राकेश कंडारे, प्रा. नारायण पवार,बचेतन निंबोळकर,सुनील गजभिये, जुबेरभाई आदी उपस्थित होते.

Copy